(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन संशयित आरोपींकडून सात मोटारसायकली जप्त केल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना गजाआड केले आहे.
प्राप्त माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात मोटरसायकल चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. त्याच्या तपासासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सचिन मोरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना याचा तपास करण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धुळे नाशिक व जळगाव जिल्ह्यात मोटरसायकल चोरी करून त्या एरंडोल तालुका परिसरात कमी दरात विक्री केली जात असल्याचे समजले. त्यानुसार पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी या पथकाला रवाना केले होते.
दरम्यान पथकाने एरंडोल तालुक्यातील आडगाव येथे जाऊन सप्ला रचला असता असता हिंमत पाटील यास ताब्यात घेतले. त्याचे पूर्ण नाव हेमंत उर्फ हिंमत पाटील (वय 26) रा. आडगाव, ता. एरंडोल असे सांगितले. त्याच्या ताब्यातून मिळालेल्या मोटरसायकली चाळीसगाव शहरातून चोरी केल्याचे सांगितले. अधिक तपासात त्याच्यासोबत चोरीच्या गाडी विक्री करणारा बाळकृष्ण उर्फ रोहित संभाजी पाटील (वय २९) रा. आडगाव यास ताब्यात घेतले आहे. तसेच जगदीश बाळू शेळके रा. पथराड, ता. भडगाव याला चोरीच्या गाड्या आणून देत असल्याचे तसेच काही ठिकाणी जगदीश सोबत हेमंत पाटील देखील मोटर सायकल चोरी करण्यासाठी जात होता. जगदीश शेळके हा सध्या मोटरसायकल चोरी आर्म ऍक्ट मध्ये पुणे येथे भोसरी पोलीस ठाण्यात आहे.
हेमंत पाटील व बाळकृष्ण उर्फ रोहित संभाजी पाटील यास या दोघांना चाळीसगाव पोलिस ठाण्यात तपास कामासाठी देण्यात आले आहे अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखेतील तो नि किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहे का दादाभाऊ पाटील नंदलाल पाटील किरण धनगर प्रमोद लाडवंजारी भगवान पाटील सचिन महाजन अशोक पाटील दीपक चौधरी भरत पाटील आदी करीत आहेत