जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या शनीपेठ या अतिसंवेदनशील परिसरात चक्क एका टोळीचा घात होताना थोडक्यात काही जण बचावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राजमुद्रा दर्पण च्या हाती लागलेल्या वृत्ता नुसार शनीपेठतील एक ठोळी दुसऱ्या टोळीला नियोजित संपविणार असल्याची माहिती मिळताच दुसऱ्या टोळीचा हस्तक असलेला परिसरातील त्यांच्या जोडीदारासोबत पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार 11:30 च्या दरम्यान झाल्याचे सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार समजते आहे. या संदर्भात स्थानिकांकडून अधिक माहिती घेतली असता मात्र या संदर्भात जाहीर कोणीही बोलायला तयार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार घटनाक्रम असा कि, शनीपेठतील श्रीकृष्ण मंदिर परिसरात एक टोळी दुसऱ्या टोळी वर हल्ला चढविण्यासाठी पाळत ठेऊन होती ज्यांच्यावर हल्ला चढविणार होते ते शनीपेठतील ममुराबाद रस्त्याकडे जाणार याची माहिती हल्लेखोरांकडे होती मात्र आपल्यावर हल्ला होणार असल्याची माहिती दुसऱ्या टोळीच्या हाती लागताच दुसऱ्या टोळीतील दोन जणांनी शनीपेठतील माजी उपमहापौरांच्या निवासस्थानापासून दुचाकीवरून पळ काढला घडलेल्या प्रकारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून शहरात अनेक टोळ्या सक्रिय झाल्या असून शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे, शनीपेठत या पूर्वी देखील अनेक समाज विघातक घटना घडल्याअसून काही प्रमाणात पोलिसांना यावर अंकुश निर्माण करता आला होता मात्र पुन्हा एकदा गुन्हेगारीने तोंड वर काढले आहे.
शहरातील गुन्हेगारीवर जर अंकुश मिळवायचा असेल तर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे असलेले नवतरुण गुन्हेगाराशी हितसंबंध संपुष्टात आणणे गरजेचे आहे याकडे मात्र पोलीस दलातील वरिष्ठ साफ दुर्लक्ष करताना दिसून येत आहे ओळख असल्याचा फायदा घेऊन अनेक जण परिसरात दहशत माजविण्याचा हट्टाहास करीत आहे अनेक प्रकरणे शहरात घडतात मात्र जळगाव जिल्हा पोलिस दलाला या प्रकरणी कोणत्याही खबरीने माहिती दिलेली दिसून येत नाही पोलीस मात्र या प्रकरणातून गाफील होते की काय ? असा सवाल उपस्थित होत आहे. गुन्हेगारी मोडीत काढण्याकरीता येणारकाळ पोलिसांसाठी आवाहनात्मक असणार आहे.