भुसावळ राजमुद्रा वृत्तसेवा । शहरातील रस्त्यावर आपले जीवन व्यथित करणारे अनाथ ,जेष्ठ , नागरिकांना दिलासा देत स्वखर्चाने कटिंग , गरम पाण्याने आंघोळ, नवीन कपडे, पोट भर जेवण देऊन आपले दर्यादिल दातृत्व सिद्ध केले आहे. कोणतीही जात – पात च्या भानगडीत न पडता रस्त्यावर आपला उदर्निवाह करणाऱ्या अनाथाच्या उशाला दीप लावण्याचे सेवाभावी उपक्रम प्रहार जनशक्तीचे पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी राबविल्याने विशेष कौतुक करण्यात येत आहे.
आज बेघर निराधार बांधवांना गेल्या अनेक वर्षापासून बेघर बांधव आनंदीत राहिले म्हणून त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणायचा एक छोटासा प्रयत्न अनिल चौधरी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. कोरोनाच्याच्या वाढत्या प्रादुर्भावा मुळे व लॉकडाऊन असल्याने गोर-गरीब नागरिकांची वाताहत झाली आहे. ह्या परिस्थिती मध्ये सर्वात जास्त त्रास अनेक बेघर गोर गरीब लोकांना झाला आहे.
जमेल तितकी मदत करू – अनिल चौधरी
नेहमीच माझा एकच हेतू राहील प्रहारचे विचार आमचे नेते बच्चुभाऊ कडू यांची शिकवण घेऊन काम करीत आहे. माझ्या परीने जमेल तितकी मदत आम्ही या निराधार लोकांना नक्की करू आणि करत राहू. या निराधार बांधवांच्या नातेवाईकांना व मुलांना माझी हात जोडून विनंती आहे व्यक्ती आजही जिवंत हाय तरी त्यांना तुम्ही सांभाळून घ्या. असे आवाहन अनिल चौधरी यांनी नातेवाईकांना केले आहे. लोकांच्या सुखा साठी लढा , फेसुबकच्या लाईक्स साठी काम करत नाही तर भुकेल्या लोकांचं पोट भराव म्हणून काम करतो या बेघर गरीब बांधवांचे दुःख माझ्या कडून पहावलं जात नाही हाच एकमेव त्या मागचा उद्देश असल्याचे अनिल चौधरी यांनी म्हटले आहे