धुळे राजमुद्रा वृत्तसेवा । एनआरएचएम अंतर्गत केलेल्या कामाचे १७ हजाराचे बिल मंजूर करण्यासाठी दोन हजाराची लाच मागितल्या प्रकरणी तालुका वैद्यकीय अधिकारी व एका वैद्यकीय अधिकाऱ्यास लाच लुचपत प्रतिबंधित विभागाकडून सापळा रचून अटक करण्यात आली आहे.
धुळे येथील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात अटक केल्याने वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या परमनंट खळबळ उडाली आहे. शिंदखेडा येथील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ भूषण मांडीत मोरे ( वय ३४) रा. भोई गल्ली वर्षी तालुका शिंदखेडा, नरडाणा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ पंकज बारकू वाडेकर वय ४१ साई मंदिर देवपूर धुळे अशी आरोपींची नावे आहे.