मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | राष्ट्रवादीचे नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यालय सचिव संजय चव्हाण यांनी तयार केलेल्या राष्ट्रवादीच्या हॅण्डबुकच्या तेराव्या आवृत्तीचे गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील, ग्रामविकास मंत्री ना. जयंतराव पाटील, आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांच्या हस्ते मुंबई येथे प्रकाशन करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी कार्यालय सचिव संजय चव्हाण, अजय बढे, दिलीप चव्हाण, अनिल पाटील आदी उपस्थित होते.