जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शहरातील प्रिंप्राळा भागात दोन गटातील तरुण हे क्रिकेट खेळत असताना त्यांच्यात मोठ्या प्रमाणात वाद झाला आपल्याच प्रभागातील प्रकरण असल्याने उपमहापौरांनी थेट पोलीस ठाणे गाठले व मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला, वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केल्याचा राग म्हणून उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या घरावर कार मध्ये येऊन काही हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचे खुद्द कुलभूषण पाटील यांनी परिसरातील नागरिकांना माहिती देताना सांगितले आहे.
दरम्यान या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून उपमहापौर कुलभूषण पाटील बचावले आहे, त्यांचा परिवार देखील खालीच असलेल्या हॉल मध्ये होता पहिल्या गोळीचा फायर झाल्याचा आवाज एकूण त्यांच्या पत्नी बाहेर आल्या होत्या अंदाधुंद गोळीबार झालेंल्या गोळीबारात कोणालाही दुखापत झालेली नाही.
उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या घरावर गोळीबार झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे, परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात त्यांच्या घराच्या आवारात जमले असून या घटनेच्या संदर्भात विविध तर्क लढवले जात आहे.
या पूर्वी देखील उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर त्यांच्याच प्रिंप्राळा स्टॉप परिसराततील जनसंपर्क कार्यालयात कुऱ्हाडीने हल्ला चढविला गेला होता या वेळी देखील कुलभूषण पाटील बालबाल बचावले होते. वेळीच सावध होत त्यांनी कुऱ्हाडीचा वार चुकीविला होता.