(राजमुद्रा वृत्तसेवा) सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मराठा आरक्षण संदर्भात सध्या जोरदार वारे वाहत आहेत. या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केंद्र सरकारला याबाबत पत्र पाठवून काही महत्वाच्या मागण्या केल्या आहेत. मराठा समाजाला आरक्षणासाठी आता केंद्र सरकारने प्रयत्न करावे अशी विनंती या पत्रात करण्यात आलेली आहे.
राज्यात सध्या मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात बऱ्याच घडामोडी घडताना दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्र सरकारला पत्राद्वारे काही मागण्या केल्या आहेत. या मागण्यांमध्ये केंद्र सरकारने मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करावे अशी विनंती केली आहे.
काय आहेत मागण्या?
● मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावे ही मागणी या पत्रात केली आहे.
● केंद्रीय मागासवर्ग आयोगा अंतर्गत मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात आलेली आहे.
● मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रात 12 टक्के आरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात आलेली आहे.
● सरकारी नोकरीतही मराठा समाजाला 13 टक्के आरक्षण मागण्यात आलेले आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून बहुचर्चित असलेला मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय राज्य पातळीवरून आता राष्ट्रीय पातळीवर पोहोचल्याची चिन्हे दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज केंद्र सरकारला पत्राद्वारे केलेली मागणी ही या विषयीचे गांभीर्य वाढवणारी असून केंद्र सरकार हा प्रस्ताव कितपत विचारात घेते हे पाहण्यासारखे आहे.