जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेने तर्फे शालेय गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी ३० गरजू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते साहित्याचे वाप करण्यात आले.
या कार्यक्रमास युवासेना जिल्हा सरचिटणीस राहुल पोतदार, महानगर प्रमुख विशाल वाणी, उपमहानगर प्रमुख गिरीश सपकाळे, महानगर समन्वयक निलेश सपकाळे, संकेत कापसे, विद्यापीठ संपर्क अधिकारी अंकित कासार, विभाग अधिकारी अमोल मोरे, चेतन कापसे उपस्थित होते.