मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली येथील वन्य प्राणी आता दत्तक घेता येणार आहे. सिंह, वाघ, बिबट, वाघाटी अशा अनेक बंदिस्त वन्य प्राण्यांची देखभाल येथे केली जाते.
उद्यानातील बंदिस्त वन्य प्राण्यांना दत्तक घेतल्यामुळे वने व वन्यजीव संवर्धनाच्या अनमोल कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी सर्वांना मिळणार आहे. वन्यजीव प्रेमी, संस्था आणि कंपनी यांनी प्राण्यांना १ वर्षाकरीता दत्तक घेऊन वन्यजीव व्यवस्थापनात सहभागी व्हावे असे आवाहन वनसंरक्षक व संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जी. मल्लिकार्जुन यांनी केले आहे. ही दत्तक रक्कम एका वर्षांसाठी आहे
वाघ ३,१०,०००, सिंह ३,००,०००, बिबट १,२०,०००, वाघाटी ५०,००० नीलगाय ३०,०००, चितळ २०,०००, भेकर १०,००० अश्या वार्षिक किमतींना या प्राण्यांना दत्तक घेता येणार असून अधिक माहिती आणि अर्ज करण्याकरीता इच्छुकांनी ‘वन संरक्षक व संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली (पूर्व) मुंबई २. अधिक्षक, सिंह विहार, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली (पूर्व) मुंबई, [email protected] , भ्रमणध्वनी क्र. ७०२०२८२७१४ येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.