जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शहरातील रस्त्यांची आणि खड्यांची भयावह अवस्था झाली आहे. सर्वत्र खड्डेच खड्डे, रस्त्यावर चिखल, पाण्याचे डबके यासह इतर समस्यांबाबत आज महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयुक्तांना घेराव घातला. शहरातील खड्ड्यांसह इतर प्रश्न मार्गी लागावेत यासाठी पालिकेत पालिकेत राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी धाव घेऊन आयुक्तांना धारेवर धरले.
सर्वसामान्य जनतेला जीवन जगणे कठीण झाले असून त्यांचा वाली कोणी राहिलेला नाही. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्यावरून चालणे मुश्कील झाले आहे. दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्या व तक्रारी लवकर सोडवाव्यात अन्यथा लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक व राष्ट्रवादीचे नेते अशोक लाडवंजारी यांनी दिला आहे.
यासंदर्भात मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या शिष्टमंडळात अशोक लाडवंजारी, साहिल पटेल, सुनील माळी, डॉ. रिजवान खाटीक, विशाल देशमुख, सुनील शिंदे, मयूर, नबील शेख, जाहिद शाह उपस्तिथ होते.