जळगांव राजमुद्रा वृत्तसेवा | महापालिकेच्या माध्यमातून मोकाट कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी नंदुरबार येथील संस्थेला काम सोपवण्यात आले आहे. या संस्थेच्या माध्यमातून 16 ऑगस्ट पासून प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे.
गेल्या अनेक दिवसापासून जळगाव शहरात मोकाट कुत्र्यांचा विषय गंभीर झाला होता. नागरिकांना कुत्रे चावल्याच्या अनेक घटना घडल्या असल्याने नागरिकांच्या पालिकेकडे तक्रारी येऊ लागल्या होत्या. नागरिकांना रात्रींच्या वेळी एकटे फिरतांना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर पर्याय म्हणून कुत्र्यांचे निर्बीजीकरण गरजेचे होत असल्याने मनपाने नंदूरबार येथील सबसमाज बहुउद्देशीय संस्थेचा निविदा मंजूर केली आहे. या संस्थेचे कामकाज 16 ऑगस्ट पासून शहरात सुरु होणार आहे.