जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जळगाव जिल्हा पोलिस दलाच्या बळकटीकरणा सह आपले पोलीस संकल्पनेच्या अंतर्गत १५ बोलेरे चारचाकी व ३९ दुचाकींसाठी निधी जिल्हा नियोजन मंडळांच्या माध्यमातून वितरीत करण्यात आला आहे. यामुळे दुसऱ्या टप्प्यातील ही वाहने लवकरच जिल्हा पोलिस दलात दाखल होणार आहेत
जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी पोलीस दलाच्या बळकटीसाठी चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी केली होती. पोलीस दलात असलेली वाहने कालबाह्य झाल्याने तसेच त्याच्या देखभाल दुरुस्तीवर आर्थिक पैसा खर्च होत असल्याने, पोलीस दलाकडून जिल्हा नियोजन समितीकडे वाहनांसाठी पोलीस अधिक्षकांना प्रस्ताव सादर केला होता. पालकमंत्र्यांनी तातडीने कारवाई करुन जानेवारी महिन्यात १ कोटी १२ लाखांवर रुपयांची तरतूद केली होती.