जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जळगांव शिवसेना महानगर तर्फे १६१ कोरोना योध्यांना १ वर्षांचे विमा संरक्षण देण्यात येणार आहेत. त्यांचे वितरण पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दिनांक ३१ जुलै शनिवार रोजी तरुण कुढापा चौकात दुपारी ४ वाजता होणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसांनिमित्त या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या वर्षापासून अनेक रुग्णवाहिका चालक, खाजगी सुरक्षा रक्षक, सफाई कर्मचारी आणि कोरोना काळात ज्यांनी योगदान दिले आहे अशा १६१ कोरोना योध्यांना १ वर्षांचे विमा संरक्षण देण्यात येणार आहे. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, सेनेचे जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे, माजी महापौर नितीन लढढा महापौर जयश्री महाजन, महानगर प्रमुख शरद तायडे, सुरेश चौधरी, सुनिल महाजन आदी उपस्थित राहणार आहेत. तरी संबंधीतांनी उपस्थित राहावे असे आवाहन महानगरचे उपप्रमुख प्रशांत सुरडकर यांनी केले आहे.