जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा |जळगाव जिल्हयांत कोरोना लस घेणाऱ्यांची संख्या दहा लाखांवर पोहचली आहे. अजून सुमारे तीस लाख जणांची लसीकरण बाकी आहे. लसीकरणांची गती पाहता अश्याच पध्दतीने लसीकरण सुरु राहीले तर, दीड वर्ष सर्वांना लसीकरणांसाठी लागेल. असे सुत्रांनी सांगितले. दरम्यान जिल्हयांत लसीचा पुरवठा अधिकाअधिक मिळण्यासाठी प्रशासन आणि पालकमंत्रयांनी प्रयत्न करने गरजेचे आहे. तर आगामी सहा महिन्यांत सर्वांचे लसीकरण होईल.
जिल्हयांत जानेवारी पासून कोरोना लसीकरणांला सुरुवात झाली. कोरोना लसीकरणांचा प्राधान्य क्रम आधी ठरवला गेला त्यात, फ्रंटलाइन वर्करांना लसीकरण करण्यात आले, त्यात आरोग्य विभागांतील डॉ. परिचारिकता व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यानंतर पोलीस महसुल विभागाला प्राधान्य देण्यात आले. त्यानंतर 45 वर्षावरील सर्वांना लसीकरणाला सुरुवात झाली. सर्व केंद्रावर लसीचा तुटवडा असला तरी, तासनतास रांगेत उभे राहून लस घेण्यासाठी या वयोगटातील नागरिकांनी धडपड केली. अनेकांनी काही ठिकाणी पहाटेपासून लसीकरणासाठी रांगा लावल्या होत्या.
18 ते 45 वयोगटातील लसीकरण सुरु झाले यावेळी सर्व केंद्रांवर युवकांची मोठया प्रमाणात गर्दी तर काही ठिकाणी गोंधळ झाला होता. यातून कोरोनाचा संसर्ग आणखी वाढू शकेल यामुळे शासनाने ऑनलाईन नोंदणी सुरु केली. ज्यांची नोंदणी झाली त्यांनाच लसीकरण झाले. यामुळे ज्यांची लसीकरणांची तारीख वेळ निश्चित झाली तेच लसिकरण केंद्रावर दिसू लागले. कमी लसींचा पुरवठा होत असल्याने लसीकरण केंद्र वारंवार बंद ठेवावी लागत आहे. याकडे प्रशासन लक्ष देणे गरजेचे आहे.