जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जळगाव शहरातील काही तरुण काहीही कामधंदा न करता दररोज दारु आणि मटनांच्या पाटर्या करुन मौजमजा करीत होते. त्यांचा संशय आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या तरुणांना ताब्यात घेतले. त्यांनी जिल्हयांत अनेक ठिकाणी घरफोडी आणि चोऱ्या केल्यांचे उघडकीस आले आहे. त्यांना पोलीसांनी अटक केली आहे. संशयीत आरोपीकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार भकाले यांना मिळाले आहेत. गोपनीय माहितीवरुन रामेश्वर कॉलनीतील काही तरुण काहीही एक कामधंदा न करता पाटर्या करुन मौजमजा करीत आहे. या पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे शाखेतील पो.नि. किरण कुमार भकाले यांच्या मार्गदर्शना खाली अशोक महाजन, प्रवीण पाटील, जयवंत चौधरी, सुनिल दामोदरे, दादाभाऊ पाटील, प्रमोद लाडवंजारी, रंजना पाटील, किरण धनगर, मुरलीधर बारी, यांनी या प्रकरणी अधिक तपास पथकांने रामेश्वर कॉलनीत परीसरात विशाल मुरलीधर धाबाडे यास ताब्यात घेतले त्याने घरफोडी व चोरींचे गुन्हे मित्रांसोबत केले असल्याचे कबुल केले. त्या अनुसंगाने बजरंग परशुराम जाधव, विशाल किशोर मराठे, यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता. त्यांनी सोबत गुन्हांची कबुली दिली आहे. आरोपी आकाश ऊर्फ आप्या सुनिल नागपुरे, हा फरार असून त्यांचा शोध सुरु आहे. दरम्यान या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे