भुसावळ राजमुद्रा वृत्तसेवा | पदभार घेण्यासाठी मुंबईत जाणाऱ्य मध्यरेल्वेच्या नुतन जी.एम. यांचे भुसावळात रविवारी स्वागत करण्यात आले. जी.एम. अनिल कुमार लाहोटी हे रविवारी पठाणकोट एक्सप्रेस ने जात असतांना गाडी भुसावळात थांबल्यानंतर डी.आर.एम. विवेककुमार गुप्ता, यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी रेल्वेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
सोलापूर, पुणे, मुंबई, भुसावळ, नागपूर या पाच विभागाच्या असलेल्या मध्य विभागाच्या रेल्वे जी.एम.पदी अनिल कुमार लाहोटी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते यापूर्वी दिल्ली येथे रेल्वे बोर्डात होते. तर रविवार पठाणकोट एक्सप्रेस जात असतांना खंडव्यापासून भुसावळ विभागातून त्यांनी यांची माहिती घेतली. रेल्वे इंजिन कारखान्याचे मुख्य महाव्यवस्थापक शिवराम यांच्या सह अनेक अधिकारी उपस्थित होते.