जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | सध्या पावसाचे दिवस सुरू झाले असून परिसरात अथवा घरातील छतावर पाणी साचू देऊ नये तसेच आपला परिसरात स्वच्छता ठेवावी असे आवाहन शहराच्या महापौर जयश्री महाजन यांनी नागरिकांना केले आहे.
पावसाळ्याच्या दिवसात डेंग्यू तसेच मलेरिया या रोगांची साथ मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असते. यामुळे नागरिकांनी आपल्या परिसरात अथवा घरात पाणी अथवा डबके साचू देऊ नये. यामुळे डेंग्यू व मलेरिया पसरण्याची दाट शक्यता आहे. महापालिका स्तरावर रोगराईच्या अटकावासाठी उपाय योजना सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती महापौर जयश्री महाजन यांनी दिली आहे.