जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | महाराष्ट्र विधान परिषदेच्या उप सभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे या शुक्रवार, दि. ६ ऑगस्ट रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. ६ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता धुळे विश्रामगृह येथून त्या जळगावकडे प्रयाण करतील.
सकाळी ११ वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. सकाळी ११:१५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जळगावकडे प्रयाण. सकाळी ११:३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन. सकाळी ११:३५ ते १२:१५ वाजेपर्यंत शासकीय अधिकारी यांच्यासमवेत कोरोनामुक्त गावांचा आढावा. दुपारी १२:१५ ते ०१ वाजेपर्यंत कोरोना काळात सामान्य नागरीक, कामगार, शेतकरी, मजूर यांना मदत देण्यासाठी शासनाच्यावतीने देण्यात आलेल्या योजनांचा आढावा. दुपारी १ वाजता शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव.
दुपारी २:३० वाजता जळगाव शिवसेना पक्ष कार्यालयाकडे प्रयाण. दुपारी २:२४ ते ४ वाजेपर्यंत जळगाव शिवसेना पक्ष कार्यालय येथे आगमन, कार्यकर्त्यासमवेत चर्चा व शिवसंपर्क मोहिमेचा आढावा. कार्यकर्त्यांशी जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत चर्चा. दुपारी ४ जळगाव शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. दुपारी ४:१५ ते ६:३० वाजता जळगाव शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.