फैजपूर राजमुद्रा वृत्तसेवा |येथील प्रांत कार्यालयला माननीय उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिलभाऊ चौधरी यांची नावलौकीक प्रतिष्ठा समाजात नैतिक अधःपतन करणारे व खोटी दिशाभुल फसवणुक करणारी माहिती प्रकाशित करणारे दैनिक वृत्तपत्रावर योग्य ती कडक कारवाई करावी अशी निवेदनच्या माध्यमातून मागणी करण्यात आली..
जळगाव जिल्हयातील काही दैनिक वृत्तपत्र हे भुसावळ येथील अनिलभाऊ चौधरी यांचे विरूध्द आकस मनाने दुर्भाव हेतूने समाजात व राजकारणात त्यांची प्रतिमा मलीन व्हावे तसेच त्यांचे राजकीय शत्रू यांचेशी हातमिळवणी करून दैनिक वृत्तपत्रात खोटी बनावट दिशाभुल करणारी बातमी प्रकाशित करून समाजात अनिलभाऊ चौधरी यांची नावलौकीक प्रतिष्ठा नैतिक अधःपतन व्हावी व शासकीय अधिकारी यांचे मनात पुर्वाग्रह निर्माण व्हावे असे दुर्भाव हेतूसमोर ठेवून आपले कायदेशीर अधिकाराचा गैरवापर करून कोणतेही तथ्य नसतांना दैनिक वृत्तपत्रांत खोटी बातमी प्रकाशित या सर्व घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या वेळी विक्की काकडे, सचिन कोळी, कल्पेश खत्री, पंकज जयकर, विलास गोयर, सुनील बिऱ्हाडे, दुर्गेश सावकारे, सागर कापडे, नाना मोची, जय किशन धावरे, प्रल्हाद बिऱ्हाडे, शेजवान चंदनशिव, दीपक बिऱ्हाडे, कल्पेश खत्री, राज गोयर, सुरज कोळी, आकाश कापडे, राजू बिऱ्हाडे, भूषण मेढे, सिद्धार्थ तायडे चेतन बिऱ्हाडे व सर्व अनिलभाऊ चौधरी प्रेमी उपस्थित होते