जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । शेती उपयोगी साहित्य चोरी करणाऱ्या एका चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखा व नशिराबाद पोलिसांनी मंगळवारी सुप्रीम कॉलनी येथून अटक करण्यात आली आहे,. पोलिसांनी चोरट्यास अटक करण्यासाठी रात्रभर पाळत ठेवत सापळा रचला होता. चोरटा जेव्हा त्यांच्या स्वतःच्या घरात पहाटे येताच पळ;पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहे.
सविस्तर वृत्त असेकी, अरविंद उर्फ आरो अरुण वाघोदे (वय २५, रा. सुप्रीम कॉलनी) याने ६ ते २७ एप्रिल दरम्यान मन्यारखेडा शिवारातील एका कंपनीतून शेती उपयोगी साहित्य व कंपनीतील वस्तू चोरुन नेल्या होत्या. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अरविंद व त्याचे तीन साथीदार गुन्हा घडल्यापासून बेपत्ता होते. ते रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. अरविंद हा मंगळवारी घरी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व नशिराबाद पोलिसांनी रात्रभर त्या परिसरात सापळा रचला. पहाटे ४ वाजेच्या सुमारास अरविंद घरी येताच त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. चोरीचे साहित्य विक्रीतून मिळालेल्या पैशाने मौजमजा केली. तर उर्वरित ७ हजार रुपये व काही साहित्य पोलिसांनी हस्तगत केले आहे. दरम्यान, पुढील तपासासाठी अरविंद अरुण वाघोदे याला नशिराबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.