जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी निवडीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे अभिनंदन करीत देशातील पशुसंवर्धन पायाभूत सुविधा निधीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करुन डेअरी फार्मींगचा समावेश करावा तसेच जैव इंधनावर राष्ट्रीय मंडळ स्थापन करा यासह मतदारसंघातील सात बलून बंधारे, टेक्सटाईल पार्क,विमानतळ , गणित नगरी, जळगाव शहराच्या दळणवळणासह औद्योगिक विकासासाठी खासदार उन्मेश पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.
देशातील पशुसंवर्धन व पायाभूत सुविधा निधीच्या (AHIF ) विद्यमान मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करावी. यामध्ये डेअरी फार्मिंगचा उल्लेख नसल्याने दुग्ध व्यवसाय हा कृषी क्षेत्राच्या पूरक व्यवसाय भरभराटीस बाधा येणार असून यासाठी विद्यमान मार्गदर्शक तत्वांच्या कलम 6 अंतर्गत यादीत समावेश करावा. यामुळे कृषिप्रधान अर्थव्यवस्थेस अधिक बळकटी मिळणारं आहे. याकडे खा. उन्मेष पाटील यांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधले.
त्याचप्रमाणे जैवइंधनावरील राष्ट्रीय धोरणांच्या वर्तमान स्थिती बाबत अवगत करीत जैवइंधनावर राष्ट्रीय मंडळ स्थापन करा अशा मंडळाच्या समग्र निर्णय प्रक्रियेतून जैवइंधनाच्या विकासासाठी विशेष संशोधन व विकासावर लक्ष केंद्रित करता येईल. बायो सीएनजी आणि इथेनॉलच्या विकासास प्रोत्साहन मिळेल. राष्ट्रीय मंडळाच्या निरीक्षणातून समन्वयातून दिशादर्शक कार्यक्रम देत अपेक्षीत प्रगती देशाला साधता येईल. अशी भुमिका खा. उन्मेश पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मांडली.
याप्रसंगी पंतप्रधानांनी मतदासंघांविषयी माहिती घेतली. खा. उन्मेश पाटील यांनी मतदार संघातील बळीराजाच्या जीवनात सिंचनक्रांती करणारा सात बलून बंधारे प्रकल्पाचा डिमांड क्रमांक 40 अंतर्गत नाविन्यपूर्ण प्रकल्पाचा समावेश करण्याबाबत आपण व्यक्तिशः लक्ष द्यावे.तरच हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल. आपल्या उपस्थितीत याचे लोकार्पण व्हावे. हा अभिमानाचा क्षण खान्देश वासियांना अनुभवता यावा अशी विनंती केली. यावेळी टेक्सटाईल पार्क, जळगाव विमानतळ,गणित नगरी, जळगाव शहराच्या दळणवळणासह औद्योगिक विकासासाठी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना खासदार उन्मेश पाटील यांनी साकडे घातले.