जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | राज्यातील प्रदेशाध्यक्ष पदाबाबत दिल्लीतून खोट्या बातम्या पसरवल्या गेल्या ह्या सगळ्या अफवा आहेत, असा कोणताही बदल अद्याप पर्यत भाजप मध्ये नाही. नवीन केंद्रीय मंत्री मंडळ स्थापन करण्यात झालं त्या निमित्ताने भेटी साठी दिल्लीत गेल्याचे गिरीश महाजन यांनी भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
दिल्लीत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील मी स्वतः होतो त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बदलाच्या कोणत्याही हालचाली नसल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेच असतील पक्ष श्रेष्ठी याबाबत निर्णय घेतील असे महाजन यांनी सांगितले.
नगरसेवक फूटी बाबत ओव्हर कॉन्फिडन्स राहिला, याबाबत अधिक माहिती मिळाली नाही अन्यथा नगरसेवक बाहेर पडले नसते यासाठी मी प्रयत्न केले मात्र आमची न्यायालयीन लढाई सुरू असल्याची माहिती महाजन यांनी दिली आहे. काही नगरसेवक पुन्हा वापसी करतील मात्र त्याचा काहीच उपयोग नाही असे यावेळी नमूद केले.