राजमुद्रा वृत्तसेवा | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यावर असलेली स्थगिती राज्य सरकारने सोमवारी मागे घेतली असून लवकरच राज्यातील पंधरा जिल्ह्यांच्या मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पंचवार्षिक निवडणुका होणार आहेत. सप्टेंबर महिन्यात या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जिल्ह्यातील मुंबई बँकांसह नाशिक, पुणे, लातूर, जळगाव, रत्नागिरी, धुळे-नंदुरबार, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या बँकांच्या निवडणूका होण्याची शक्यता वर्तवली आहे. या बँकांच्या सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या संचालक मंडळाची मुदत ६ मे २०२० रोजी संपली असून ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांना सहकार विभागाने स्थगिती दिली होती. मात्र सोमवारी या निवडणुकांवरील स्थगिती उठवण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच राजकीय रणधुमाळी वाजण्याच्या शक्यता आहे.