चाळीसगाव राजमुद्रा वृत्तसेवा | श्रीमंतांसाठी रेसकोर्सवर घोड्यांच्या शर्यती चालतात, मग महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील संस्कृती टिकवणाऱ्या व गोवंश वाढीसाठी प्रोत्साहन देणाऱ्या बैलगाडा शर्यती का खुपतात ? असा सवाल करत चाळीसगाव तालुक्याचे आ. चव्हाण यांनी चाळीसगाव येथे आयोजित बैलगाडा शर्यंत बंदी विरोधातील निषेध मोर्चात केला.
हे आंदोलन म्हणजे सुरुवात असून येणाऱ्या काळात मुख्यमंत्री यांनी सर्व बैलगाडा चालक मालक संघटनांसोबत बैठक घ्यावी व हा विषय गांभीर्याने घेत सर्वोच्च न्यायालयात तातडीने सुनावणी घेत भूमिका मांडावी, अन्यथा राज्यातील सर्व बैलगाडा शर्यत प्रेमी मंत्रालयाच्या आणि मंत्र्यांच्या दावणीला बैल बांधून आंदोलन करतील असा इशारा देखील आ. चव्हाण यांनी दिला.
कृषी उत्पन्न बाजार समिती येथून छत्रपती शिवाजी महाराज व स्व.रामराव जिभाऊ पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आली. तेथून तितूर नदीवरील नवीन पूल मार्गे तहसील कचेरी हून छत्रपती शिवाजी महाराज चौक इथपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.
बैलगाडा शर्यत सुरु होण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चाला नाशिक, धुळे, औरंगाबाद जिल्ह्यातील बैलगाडा संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, जामनेर आदी तालुक्यातील बैलगाडा शर्यत प्रेमी उपस्थित होते.
मखमलाबाद नाशिक येथील येथील मोतीराम अप्पा पिंगळे, खडकजाम नाशिक येथील शांताराम तात्या पगार, राजू महाले अंतुर्ली, गणेश थेठे पालखेड नांदूर, किशोर गांगुर्डे, नांदगाव येथील राजू महाजन, नारायण सीताराम सोनवणे, हिंगणे देहरे, नांदगाव, मल्हारी एरंडे कासोदा, गोपाळ परदेशी वाडे, चाळीसगाव तालुक्यातील संतोष सोनवणे शिंदी, उत्तम अप्पा चौगुले, छोटू पेहलवान, छोटू शेख, संभा पाटील वडाळा, योगेश चव्हाण हिंगोणे, दिनेश गायकवाड, बाळासाहेब पाटील रोकडे, भाऊसाहेब ठाकरे रांजणगाव, समाधान थेटे शिंदी, गटलु पेहलवान नेरी, नितीन तीकांदे शिंदी, दादा बोराडे चाळीसगाव, समाधान चौधरी, दादा पवार, युनुस खाटिक, गौतम सोनवणे, दीपक गायकवाड, नितीन पाटील डामरून, प्रवीण पांचाळ बोरखेडा, विठ्ठल आगोणे चाळीसगाव आदी उपस्थित होते.
भाजपा युवा मोर्चाचे भावेश कोठावदे, विशाल पाटील, विशाल धनगर यांनी आंदोलनाला सर्व तरुण वर्गाचा पाठींबा असल्याचे आपल्या मनोगतातून सांगितले. आंदोलनाची सांगता चाळीसगावचे तहसिलदार अमोल मोरे यांना बैलगाडा शर्यत मालक चालकांचे निवेदन देऊन करण्यात आली.