जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | लवकरच जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शालेय पाठ्यपुस्तकांची प्रतीक्षा संपणार असून जिल्ह्यातील ४ लाख २२ हजार ४०३ लाभार्थी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचा फायदा होणार आहे. याविषयी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र प्रदेश समन्वयक दिव्या यशवंत भोसले यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग तसेच उपशिक्षण जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र सपकाळे यांना निवेदन देऊन वेळोवेळी पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावला.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तके वाटप केली जातात. मात्र यावर्षी कोरोना संसर्गाची तीव्रता कमी होत असतांनाही प्रत्यक्ष शाळेला सुरुवात झाली नसली तरी ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आहे. मात्र आद्यपही विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळालेली नव्हती. त्याच पार्श्वभूमीवर दिव्या भोसले यांनी मार्ग सुकर केला आहे. नाशिक विभागाकडून पाठ्यपुस्तकांच्या वितरण सुरुवात झाली असून लवकरच केंद्र स्तरावर वितरणाला सुरुवात होईल.