जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । जिल्हा दूध संघात बेकायदेशीर २६३ जागा कर्मचारी भरती प्रक्रिया होत असून उमेदवारांची फसवणूक केली जात आहे. जिल्हा दूध संघाचे एम डी मनोज लिमये यांची बोगस नियुक्ती तत्कालीन संचालकांनी केली असून त्यांना भरती प्रक्रिया राबवण्याचा कोणताही अधिकार नसल्याचा गौप्यस्फोट जिल्हा दूध संघाचे माजी सुरक्षा अधिकारी एन जे पाटील यांनी केला आहे. एकूण २० ते २५ कोटींचा भ्रष्ट्राचार असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. जळगाव जिल्हा दुग्ध संघा कडून दुसऱ्यांदा भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ती देखील वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शासनातील काही भ्रष्ट्र अधिकारी या सर्व प्रकरणात लाच घेऊन सहकार्य करतात म्हणून बेकायदेशीर भरती दुग्ध संघात केली जात असल्याचे खळबळ उडवून देणारे आरोप करण्यात आले आहे.
यांना दिली नोटीस
दुग्ध संघाचे माजी सुरक्षा अधिकारी एन जे पाटील यांनी राज्याचे दुग्ध मंत्री सुनील केदार, राज्याचे मुख्यसचिव ,सचिव गृहखाते ,सचिव दुग्ध खाते ,विभागीय उपनिबंधक सह. संस्था – दुग्ध नाशिक , जिल्हा दुग्ध संघाच्या चेरमन मंदाकिनी खडसे , कार्यकारी संचालक मनोज गोपाळ लिमये यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. यामध्ये पुढील पंधरा दिवसात सविस्तर खुलासा न केल्यास कायदेशीर लढाईला सामोरे जाण्याचा ईशारा दिला आहे.
काय आहे नोटीस –
१९९५ पासून ते ऑगष्ट २०१५ पर्यत एनडीडीबी ला ज्यावेळी दुग्ध संघाचा कारभार सोपविण्यात आला त्यावेळी शासनाचा कोणताही करार करण्यात आलेला नाही त्यामुळे एनडीडीबी ला कोणताही कार्यकारी संचालक अथवा अन्य अधिकारी नेमण्याचा अधिकारी नाही होता. तत्कालीन महाराष्ट्रातील लोकसेवकांनी गैरकायदा गैरफायदा करून घेण्यासाठी एनडीडीबी च्या पदाधिकाऱ्यान सोबत अन्यायाचे संगनमत करून एनडीडीबी च्या गुन्हेगारांना बेकायदा संरक्षण प्रधान करून गुन्हा केला त्या काळात कोणत्याही प्रकारच्या तक्रारीची दाखल घेण्यात आलेली नाही. त्या काळात एनडीडीबी सोबत शासनाचा कोणताही करार झालेला नाही ते असताना एनडीडीबीने मनोज लिमये यांची बोगस नियुक्ती केली आहे यामुळे बोगस नियुक्ती असणाऱ्या मनोज लिमये यांना दुग्ध संघात भरती प्रक्रिया राबवण्याचा कोणताही अधिकार असल्याची माहिती माजी सुरक्षा अधिकारी एन जे पाटील यांनी दिली आहे.
पुन्हा कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती
दुग्ध खात्याचे उपसचिव एस एम साठे यांनी २०१३ मध्ये मनोज लिमये यांना दुग्ध संघाच्या कार्यकारी संचालक पदासाठी मान्यता प्रधान केली मात्र मनोज लिमये यांची २००० व २०१३ दरम्यान संघाच्या पोट नियमानुसार गठीत तज्ञ समितीने केलेली नाही तसेच मनोज लिमये हे २०१३ पासून २०१८ कार्यकारी संचालक म्हणून होते त्यानंतर चेरमन मंदाकिनी खडसे यांनी पुन्हा मनोज लिमये यांची कार्यकारी संचालक म्हणून बोगस नियुक्ती केली अशी माहिती माजी सुरक्षा अधिकारी एन जे पाटील यांनी राजमुद्रा शी बोलताना दिली आहे.
दुग्ध संघातील सुरु असलेल्या कारभाराबाबत वेळोवेळी पत्रकार परिषद अथवा निवेदन देऊन एन जे पाटील यांनी विविध प्रश्न उपस्थित केले असून त्यांची न्यायालयीन लढाई देखील सुरु आहे. दुग्ध संघाने पुन्हा भरती प्रक्रियेची जाहिरात माध्यमांमध्ये दिल्या नंतर पुन्हा एकदा एन जे पाटील यांनी केलेल्या आरोपा नंतर भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.