जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | पशु पापा असोसिएशन जळगाव या सामाजिक संस्थेअंतर्गत १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून खाजगी पाळीव व भटक्या प्राण्यांसाठी मोफत रेबीज लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या विशेष निमित्ताने शहरातील पाळीव तसेच भटक्या प्राण्यांना रेबीज या आजाराची मोफत लस यावेळी देण्यात आली. ख्वाजामिया दर्ग्याजवळ प्रीमियर पेट क्लिनिक या ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात आला. पाळीव प्राण्यांसोबतच भटक्या प्राण्यांनाही रेबीज या आजाराची लागण होऊ नये, जेणेकरून या प्राण्यांचा मानवाला धोका होणार नाही, या उद्देशाने हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आले.
या उपक्रमास डॉ. जय राजपूत, डॉ. अश्विनी दाभाडे यांचे विशेष सहकार्य लाभले. याप्रसंगी भवानी अग्रवाल, हर्षल भाटिया, सागर करडा, गुंजन पाटील, गौरव रायगडे, सुयश जाधव, ऋषिकेश देशमुख तसेच पशू प्रेमी उपस्थित होते.