जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जळगाव ग्रामीण मतदार संघातील धरणगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये १६ ऑगस्ट सोमवार रोजी विविध कार्यक्रम आणि भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे.
कवठळ येथे जिल्हा परिषद सेस अंतर्गत तीन लाख रुपये खर्चाचे पेवर बसविणे, तसेच चोरगाव येथे २५/५ अंतर्गत सहा लाख रुपये खर्चाचे पेवर बसविणे, चांदसर येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मुख्य इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या इमारतीच्या बांधकामाला दोन कोटींची तरतूद करण्यात आली आहे. परिसरातील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच तसेच विकास सोसायटीचे चेअरमन, संचालक, शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.