मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | आपल्या विरोधातल्या ईडीच्या कारवाईपासून संरक्षण मिळावे, यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे आता देशमुख यांना ईडी समोर हजर रहावे लागण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडी कडून मनी लाँड्रिंग प्रकरणीच्या कारवाईपासून कारवाईपासून संरक्षण मिळावे, अशी मागणी केली होती. त्याचबरोबर देशमुख यांनी केंद्रीय एजन्सीनं जारी केलेल्या समन्सला आव्हान दिलं असून त्यांचा मुलगा ऋषिकेशलाही संरक्षण देण्याची मागणी केली होती. ही याचिका सुप्रिम कोर्टाने फेटाळल्याने देशमुखाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
या याचिकेत देशमुख यांनी ईडीच्या कारवाईपासून संरक्षण मिळण्याची मागणी केली होती. ती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. कायदेशीर प्रक्रियेनुसार याबाबतची कार्यवाही होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे