जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | राज्यातील सर्व शॉपिंग मॉल सर्व दिवस व रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तथापि शॉपिंग मॉल मध्ये काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचारी यांना प्रवेश करणाऱ्या सर्व नागरिकांचेही हो कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण झालेली असावी. व दुसरी मात्रा घेऊन चौदा दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. तसेच लसीकरण प्रमाणपत्र व त्याच्या समवेत फोटो सहित ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहणार असल्याच्या सूचना शासनाचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिले आहेत.
हे आदेश आपत्ती निवारण कायदा 2005 नुसार सक्षम प्राधिकारी म्हणून अध्यक्ष राज्य व्यवस्थापन कमिटी यांनी पारित केले आहेत. या आशयाचे आदेश आज 16 ऑगस्ट रोजी काढण्यात आले दरम्यान अठरा वर्षाखालील मुलांचे लसीकरण अद्याप सुरू न झाल्याने 18 वर्षाखालील वयोगटातील मुलामुलींना मॉल मध्ये प्रवेश करताना वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड आयकर विभागाने निर्गमित केलेले पॅन कार्ड किंवा व याचा उल्लेख असलेले शाळा किंवा महाविद्यालयाचे वैध ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखवणे आवश्यक राहणार आहे.