जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या अंगणवाडीतील निर्जळी दूर व्हावी, जलजीवन मिशनच्या माध्यमातून या अंगणवाड्यांची लवकरात लवकर नळजोडणी करण्यात यावी या मागण्यांसंदर्भाचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांना राष्ट्रवादी युवती काँग्रेस उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांच्या तर्फे देण्यात आले आहे.
जिल्हात एक हजार कुपोषित बालकांची आकडेवारी समोर आल्याने पालक वर्गात भितीचे वातावरण झाले आहे. ३४६० अंगणवाड्यांपैकी अद्याप १६३२ अंगणवाड्यांमध्ये जोडणी झाले नसून स्वच्छता गृहाचाही अभाव असल्याचे समोर आल्याने अंगणवाड्यांच्या बाबतीत अनेक समस्या भेडसावत असल्याचे दिसून आले आहे. शासनातर्फे शुन्य ते सहा वयोगटातील बालक, स्तनदा माता, गरोदर माता, किशोरवयीन मुली यांच्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. यात शिक्षण, आरोग्यवर्धक मार्गदर्शन, सुपोषण यावर भर दिला जातो. यासाठी अंगणवाडी, मिनी अंगणवाडी कार्यान्वित असून त्यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस कार्यरत आहेत.
बालक, माता, मुली यांच्यासाठी महत्वाच्या असलेल्या या अंगणवाड्या गावातील मोकळया जागेत, विरळ वस्ती भागासह वाडी वस्तीवर, पाड्यावर असल्याने दुर्गम भागातील अंगवाडीत बहूधा पिण्याच्या पाण्याची सुविधा किंवा सांडपाण्याची सोय उपल्बध नसते. यामुळे या ठिकाणी पोषण आहार घेतला तर पाणी प्यायचे कुठले? असा प्रश्न भेडसावत आहे. या स्थितीचा केंद्राच्या जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक अंगणावाडीत पाण्याची सोय महत्वाची मोहीम शासनाने हाती घेतली असून जिल्हातील सर्व अंगणवाड्यांना याअंतर्गत शाश्वत पाणी पुरवठा उपल्बध करून देऊन लवकर नळजोडणी करण्यात यावी याबाबत निवेदन देण्यात आले. यासंदर्भात सीईओ डॉ. पंकज आशिया यांनी लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.