मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | भुसावळ नगरपालिकेच्या प्रस्तावित कामांसंदर्भात तसेच अम्रूत योजना व नगरपालिकेच्या काही प्रलंबित प्रश्नांसंदर्भात भुसावळच्या नगरसेवकांनी ना एकनाथ राव खडसे, जलसंपदा मंत्री ना जयंतराव पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना गुलाबराव पाटील यांची मुंबई येथे भेट घेतली.
लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, प्रा सुनील नेवे, मा प्र नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, वसंत पाटील, पुर्षोत्तम नारखेडे, किरण कोलते, बोधराज चौधरी, देवा वाणी, अमोल इंगळे, दत्तू सुरवाडे, दिनेश नेमाडे, किशोर पाटील आदी नगरसेवकांनी मुंबई येथे मान्यवरांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली. यासंदर्भात प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लागण्याचे आश्वासन मान्यवरांतर्फे देण्यात आले.