जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा :जिल्यात कोरोनाचे नवीन चार रुग्ण समोर आले. त्यात जळगाव शहरात एकही नवीन बाधित निष्पन्न झाला नाही. दिवसभरात सहा रुग्ण उपचारांती बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. सध्या शहरात चार तर जिल्यात २६ सक्रीय रुग्ण आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच रुग्णांपैकी १७ रुग्ण हे होम आयसोलेशन मध्ये आहेत. तपासणीसाठी पाठवलेले जिल्यातील ३५३ अहवाल मात्र अद्याप प्रलंबित आहेत.