जळगाव राजमुद्रा वृतसेवा | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्या बद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याने संपूर्ण राज्यभरात केंद्रीय मंत्री नारायण राणेंविरुद्ध राज्यभर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. जळगावातील शहर पोलीस ठाण्यात नारायण राणे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. जळगाव जिल्हा शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत नारायण राणेंचा निषेध केला. दरम्यान शिवसेनेकडून डुक्कर मागवत त्याला नारायण राणे यांचा मुखवटा लावण्यात आला. त्याची तुलना नारायण राणेंसोबत करण्यात आली आहे. डुकराच्या अंगावर नारायण राणेंचा फोटो असलेले कटआउट लावून ते टॉवर चौकात सोडण्यात आले.
यावेळी संपूर्ण टॉवर चौक परिसर दणाणून गेला होता, शिवसैनिकांचा आक्रमक पणा पाहून पोलिसांनी काही विपरीत घडू नये म्हणून योग्य तो फौजफाटा तैनात केला होता
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी जळगाव शहरातील शिवसेनेचे महापौर जयश्री महाजन यांनी पोलीसात तक्रार दिली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात येत आहे. यावेळी गजानन मालपुरे, शोभा चौधरी , सरीता माळी, अस्मिता पाटील, अनंत जोशी,विराज कावडीया, मानसिंग सोनवणे,ज्योती शिवदे,प्रशांत सुरळकर,अमित जगताप,नगरसेवक गणेश सोनवणे, यांच्यासह पदाधिकारी शिवसैनिक आदी उपस्थित होते.