नवी दिल्ली राजमुद्रा वृत्तसेवा | केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी केलेल्या वक्तव्यावरुन काल दिवसभर राजकीय संघर्ष पेटलेला संपूर्ण देशाने पाहिला यामुळे राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली होती यापूर्वी देखील केंद्रीय मंत्री असलेल्या दोन लोकांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
आतापर्यंत देशाच्या इतिहासामध्ये तीन वेळा केंद्रीय मंत्र्यांना अटक झाली आहे यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळातील केंद्रीय मंत्री टीआर बालू आणि कें मुरसोली मारण हे उद्योग मंत्री असताना तसेच एम करुणानिधी डीएमके त्यावेळी एनडीए सरकार मध्ये होते डीएमके च्या कोट्यातून त्यांना मंत्रीपद मिळाले असताना हे नेते एका तिसऱ्या देण्याच्या भानगडीत फसले त्यामुळे त्यांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागले या प्रकरणामुळे त्यांनी न्यायालयीन लढली आहे.
तामिळनाडूमध्ये के आय डी एम के ची सत्ता आली होती जयललिता या नुकत्याच मुख्यमंत्री झाल्या होत्या 3 जून 2001 मध्ये जयललिता यांच्या आदेशानुसार राज्यातील माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी यांना अटक करण्यात आली होती चेन्नईतील कथित फ्लायओव्हर घोटाळ्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता जेव्हा पोलीस करुणानिधी यांना अटक करत होते त्यावेळी डीएमके चे कार्यकर्ते आडवे आले होते बालू आणि मुरसोली मारणं घटनास्थळी दाखल होते पोलिसांनी घोटाळ्यातील आरोपी या प्रकरणी करुणानिधी यांना अटक केली मात्र सरकारी कामात व्यत्यय आल्याबद्दल बालू आणि मारन यांना देखील अटक करण्यात आली त्याचबरोबर डी एम के च्या काही कार्यकर्त्यांची देखील धरपकड करण्यात आली होती मारन यांना धक्काबुक्की झाल्याने त्यांना रुग्णालयात देखील दाखल करण्यात आल्याचे सांगितले जाते.
राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे रायगडमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांचा तोल सुटला व त्यांनी मुख्यमंत्र्यांन बाबत आक्षेपार्ह व्यक्तव्य केले यामुळे त्यांची अटक व सुटका करण्यात आली. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले त्यावेळी त्यांनी हिरक महोत्सव हा शब्द वापरला मात्र उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृतमहोत्सव असल्याचं सांगितलं त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली वा 74 वर्ष पूर्ण करून 75व्या अमृत महोत्सवी नाही… हीरक महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करीत असल्याचा त्यांनी सांगितलं त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली मुख्यमंत्र्यांचा या शब्दाचा नारायण राणे यांनी समाचार घेत मी तिथे असतो तर कानाखाली लावली असती अशा शब्दात नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका केली या प्रकरणी राणे यांच्या विरोधात नाशिक महाड पुण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत रात्रीच त्यांना महाड पोलिसांनी ताब्यात घेत न्यायालयात हजर केले व त्यांना दंडाधिकाऱ्यांनी पंधरा हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे