जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा |जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी शहर काँग्रेस कमिटीने केली आहे, यासंदर्भात काँग्रेस समितीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विविध प्रमाणपत्रे दाखले सातबारा जळगाव जिल्ह्यामध्ये महा-ई-सेवा केंद्रामार्फत दिले जात आहे परंतु जनतेने महा ई केंद्र सेवा ठरलेल्या दरा पेक्षा जास्त प्रमाणात पैसे घेतात अशा तक्रारी आल्या आहेत. आणि तसेच लोकांची होणारी आर्थिक लुबाडणूक आणि प्रमाणपत्रे वेळेवर दिले जात नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत तरी प्रशासनाने सेतू सुविधा केंद्र कार्य कार्यान्वित करून नियमानुसार निविदा प्रक्रियेचा अवलंब करावा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष अमजद पठाण श्याम तायडे जगदाळे पटेल जाकीर बागवान प्रदीप सोनवणे आदी