जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | गणेशोत्सव आता काहीच दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि शिवाजीनगर पटेल वाडी भागात गणेश मूर्ती बनविण्याचे कारखाने बऱ्याच प्रमाणात आहे, येथील मूर्तिकारांना आपल्या गणेश मूर्ती त्यांच्या कारखान्यातून बाहेरगावी विक्रीसाठी नेण्याकरता वाहनातून घेऊन जावे लागते. या परिसरातील रस्त्यांची अवस्था अतिशय खराब दुर्दशा झालेली आहे. ठिक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत तर पावसामुळे सर्वत्र रस्त्यावर चिखल पसरलेला आहे. रस्त्यातून या मूर्तिकारांना आपली वाहने नेण्या आणण्यास खूपच त्रासदायक होत आहे. गणेश मूर्तींची तुटफुट होत असून यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी शिवाजी नगर येथील शिवसैनिक विजय बांदल यांनी केली आहे.
तसेच अनेक गणेश भक्त आणि ठिक ठिकाणांहून गणेश मंडळांचे कार्यकर्ते गणेश मुर्ती घेण्याकरता या कारखान्यांवर येत असतात अशावेळी त्यांना रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेतेमुळे गणेश मूर्ती नेण्यास खूप त्रासदायक परिस्थिती निर्माण होते, जर गणेशमूर्तींची तुटफुटत झाली तर गणेश भक्तांच्या धार्मिक भावना ही दुखावतात. या पूर्वी देखील या रस्त्यासाठी निवेदन दिलेली आहे या परिसरातील राहणा-या नागरिकांना भरपूर त्रास सहन करावा लागत आहे या या सर्व बाबींचा आपण सहानुभूतीपूर्वक विचार करून शिवाजी नगर, पटेल वाडी येथील नागला किराणा ते राजू पाटील यांच्या गणपती कारखान्यापर्यंत असलेला रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.