जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जिल्ह्यात दगडी बँक म्हणून प्रसिद्ध असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे पारडे जड राहणार असल्याचे दिसून आले आहे. भाजपाने जोर लावून विरोधी पक्षांच्या अडचणीत वाढ करू शकतो. तर दुसरीकडे काँग्रेसने ताकत नसतांना स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यामुळे या निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागून आहे बँकेच्या 21 संचालकांचा निवडीसाठी लवकरच सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.
परंतु त्यापूर्वी विविध राजकीय पक्षाच्या इच्छुकांची चाचपणी सुरू केली आहे त्या पार्श्वभूमीवर येत्या सोमवारी 30 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत बँकेत व इच्छुक उमेदवारां बाबत चर्चा होऊन निर्णय होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांनी दिली आहे. सहकारात पक्षीय राजकारण आणता कामा नये एकमेका साहाय्य करू…. अवघे धरू सुपंथ…! या उती प्रमाणे या बँकेचे निवडणूक गाजण्याची शक्यता आहे.
जर राजकीय पक्षांनी ठरवले तर काहीही बदल न करता सर्वपक्षीय एकजुटीने या निवडणुकीत पॅनल लढवले जाऊ शकतात ही निवडणूक सर्वपक्षीय वाटाघाटी करून बिनविरोध निवडून आणण्याचा प्रयत्न काही नेत्यांचा असला तरी त्याला कितपत साथ मिळते सर्व चित्र अवलंबून आहे यावेळी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची पारडे जड राहणार आहे. कारण भाजपाला सोडचिठ्ठी देऊन दिग्गज नेते एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे गेल्या निवडणुकीत भाजप मध्ये असताना त्यांच्या पॅनलचे बहुमत होते हुकुमी राज्य खडसे यांचे होते. तीच परिस्थिती कायम राहण्यासाठी फक्त पक्ष बदलला असला तरी अध्यक्षाची धुरा आपल्याकडेच येईल असा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचा असल्याचे दिसून आला आहे. तसेच भाजपाचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी अद्याप जोर लावला नसला तरी त्यांच्या समर्थकांसह इच्छुकांची भाऊगर्दी यावेळी निश्चित मानली जात आहे. तसेच काँग्रेसने जिल्ह्यात आपली ताकद नसताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्यामुळे काँग्रेसला ही निवडणूक स्वबळावर लढवावी लागणार आहे त्यामुळे यंदा काँग्रेसच्या वाट्याला निराशा येण्याची परिस्थिती आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनल करिता चाचपणी सुरू आहे. यासंदर्भात पक्षाने युव्हरचना आखण्यासाठी लवकरच सर्वपक्षीय नेत्यांची बैठक मुंबईला होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिले आहे. या बैठकीत पक्षनिहाय जागावाटपाचे सूत्र ठरवल्यावर चर्चा होणार आहे तसेच निवडणूक बिनविरोध होण्यासाठी काही नेत्यांचा कसोशीने प्रयत्न सुरू आहे. त्याला यश कितपत येते हे आगामी काळात पडणार आहे.
दरम्यान या बैठकीसाठी शिवसेनेचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेतला आहे त्यांनी गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे नेते माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेऊन चर्चा केली होती त्यानंतर भाजप नेते गिरीश महाजन यांची ही भेट घेऊन ही सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. जर आगामी बैठकीत काही निर्णय झाला नाही तर राजकीय पक्ष ही निवडणूक लढवणार अशी भूमिका तयारी काही नेत्यांनी सुरू केल्या आहे. यावेळी बँकेच्या संचालक मंडळात 21 पैकी सर्वाधिक सहा संचालक हे भारतीय जनता पार्टीचे होते त्यापाठोपाठ सहा संचालक राष्ट्रवादी काँग्रेसचे तर चार संचालक शिवसेनेचे होते एक संचालक सर्वपक्षीय मानले जाणारे होते. राष्ट्रवादीचे नेते खडसे हे भाजपा सोडून आता राष्ट्रवादीमध्ये आल्यामुळे परिस्थिती बदलली आहे निवडणुकीत आणि त्यानंतर अध्यक्षपदासाठी होणारी रस्सीखेच आणि अध्यक्षपद आपल्याकडे राहावे म्हणून राष्ट्रवादीने आतापासून जोर लावला आहे त्यादृष्टीने नियोजन सुरू असल्याचे एका पदाधिकाऱ्याने आपल्या नावाचा उल्लेख न करता सांगितले.
राज्यात महा विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र असलेले शिवसेनाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत गेली तर यावेळी निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगण्याची राजकीय शक्यता व्यक्त करण्यात आली आहे सर्वपक्षीय पॅनल चे प्रयत्न जर यदा कदाचित असले तर ऐनवेळी अडचण होऊ नये म्हणून भारतीय जनता पार्टी स्वबळाची चाचपणी करीत आहे. आतापर्यंत काही पक्षांकडे इच्छुकांची संख्या मोठी असल्याने किती कुणाला द्यावे आणि कुणाला देऊ नये असा पेच निर्माण झाला आहे प्राथमिक अंदाजानुसार पक्षाने जळगाव, धरणगाव, अमळनेर, पारोळा, एरंडोल, चाळीसगाव, जामनेर , मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर या मत मतदार संघात काही इच्छुक उमेदवारांना हिरवा कंदील दिला आहे परंतु आता अंतिम निर्णय चर्चा केल्यानंतर पक्षश्रेष्ठी येणार असल्याचे सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार विकास सोसायटी मतदार संघाच्या 15 जागांचा इतर मतदारसंघातील सहा जागांबाबत भाजपाने इच्छुकांच्या प्राथमिक नावाची यादी तयार केले आहे. त्यानुसार आमदार सुरेश भोळे, माजी आमदार शिरीष चौधरी, विजय महाजन, प्रशांत पवार, आमदार मंगेश चव्हाण, आमदार गिरीश महाजन, अतुल पाटील, नयना कांडेलकर, आमदार संजय सावकारे, विनोद पाटील, प्रशांत चौधरी, नंदू महाजन, पंडित शिंदे, नारायण चौधरी, प्रभाकर चौधरी, खासदार उन्मेष पाटील, राजेंद्र राठोड, माजी आमदार स्मिता वाघ यांचा समावेश असल्याची चर्चा आहे.
तर काही तालुक्यात बाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही त्यात किंवा संभाव्य यादीत फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्हा बँकेच्या आजवरच्या झालेल्या इतिहासावर एक नजर टाकली असता वाटाघाटी करूनच संचालक मंडळ स्थापन झाले आहे. आताही सर्वपक्षीय पॅनल साठी राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विशेष म्हणजे गेल्या वेळी सर्वपक्षीय पॅनल साठी एकनाथ खडसे यांनी प्रयत्न केले होते. त्यामुळे त्यांच्या खास मर्जीतील संचालकांची अध्यक्षपदी वर्णी लागली होती. या वेळेस एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे तसेच जिल्हा बँकेत राष्ट्रवादीची ताकद पाहता अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचा दावा मजबूत राहणार आहे. आता सर्वपक्षीय पॅनल चे प्रयत्न किती यशस्वी होतात यावर सर्व चित्र अवलंबून राहणार आहे.