जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जिल्हा मध्यवर्ती बँकेने संत मुक्ताई साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाचा गैरव्यवहाराचा टपका ठेवत जिल्हा बँकेला नोटीस बजावली आहे. याप्रकरणी जिल्हा बँकेने विविध योजनांच्या माध्यमातून दिलेल्या कर्जाचा तपशील ईडी तपासणार आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या साखर कारखाण्यावर ईडीने जप्तीची कार्यवाही केली आहे. त्याच पद्धतीने संत मुक्ताई साखर कारखान्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. ईडीच्या चक्रात खडसे गुंतले असताना याचा फायदा घेत भाजपने निवडणुकीत स्वतंत्र पॅनल उतरवण्याची तयारी दर्शवली आहे.
यामुळे तोंडावर असलेली जिल्हा बँक निवडणुक देखील चांगलीच रंगण्याची शक्यता आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे,माजी मंत्री आ.महाजन,पालकमंत्री पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजले आहे. अध्यक्षपद खडसे यांच्या घरात आहे. खडसे यांच्या सुपुत्री जिल्हा बँकेच्या चेअरमन ऍड. रोहिणी खडसे सध्या अध्यक्षपद उपभोगत आहे. गेल्या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल निवडून आणत खडसे यांनी एक हाती सत्ता जिल्हा बँकेत मिळवली होती. मात्र आता खडसे राष्ट्रवादीत दाखल झाल्याने चित्र बदलले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्व पक्षीय पॅनल निवडून आणण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहे. यासाठी ते खडसेंच्या संपर्कात आहे. मात्र माजी मंत्री आ. गिरीश महाजन हे स्वतंत्र पॅनल उतरवण्याच्या तयारीत असल्याचे भाजपच्या राजकीय सूत्रांनी सांगितले आहे. खडसे यांच्या परिवारा भोवती ईडीचा फास कायम असताना या संकट काळात ते देखील राजकीय फासे फिरवू शकतात असे जाणकारांचे मत आहे.
सुरू असलेला ईडी चा ससेमिरा त्याच्यामागे कायम आहे. यामुळे ईडीच्या कारवाईचे पडसाद जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर असणार आहे.