जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेत आज सर्वपक्षीय पॅनल अस्तित्वात आहे. अशाच स्वरूपाचे आणखी पुढील पाच वर्ष सर्वपक्षीय पॅनल राहावं असं वक्तव्य माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केले आहे अपेक्षाही सर्वांचीच आहे उद्या येणाऱ्या तीस तारखेला सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांची बैठक घेऊन सर्व पक्षीय उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न आहे, असे मला मुंबई तिथे माझ्या घरी येऊन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले, मागच्या कालखंडामध्ये सर्व पक्षीय पॅनल व्हावे यासाठी मी पुढाकार घेतला होता, आता आमदार गुलाबराव पाटील हे पुढाकार घेत आहे ,त्यांना आम्ही सर्व मिळून सहकार्य करू असे खडसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
दरम्यान, जिल्हा बँक निवडणुकीचे वारे वाहत असताना बँकेच्या संचालक मंडळात वातावरण तापले आहे. भाजपकडून स्वतंत्र पॅनल उभे करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, मात्र यासंदर्भात माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. यामुळे उद्या होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीकडे लक्ष लागले आहे अजिंठा गेस्ट हाऊस येथे सर्वपक्षीय बैठक होणार असून नेमकं या बैठकीत काय घडते हे पाहणे आवश्यक आहे. जर भाजपने स्वतंत्र पॅनल उभे केले तर निवडणूक अटी-तटी ची होणार आहे. मात्र असे असले तरी राष्ट्रवादी आघाडीवर असण्याची शक्यता आहे, आजी-माजी संचालक हे भाजप नेते गिरीश महाजन यांच्या संपर्कात असल्याचा दावा काही न्युज पोर्टल वरून करण्यात आला आहे. राष्ट्रवादी मधून भाजपने संचालक फोडले तर राष्ट्रवादीसाठी जिल्हा बँक निवडणूक शर्यतीची करणार आहे. भाजपच्या खेळीमुळे पालकमंत्र्यांनी सर्वपक्षीय पॅनलचा करीता केलेले प्रयत्न अपयशी ठरतात की काय ? अशी शंका उपस्थित केली जात आहे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची ईडीची चौकशी सध्या सुरू आहे, भोसरी भूखंड प्रकरणात तसेच मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांच्यावर ताशेरे ओढले आहे. मात्र या सर्व संकट काळात आपला राजकीय मार्ग खडसे कशा पद्धतीने सोपा करतात याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागून आहे. एवढेच नाही तर जिल्हा बँकेने संत मुक्ताई साखर कारखान्याला दिलेल्या कर्जावरून ईडीने नोटीस जिल्हा बँकेच्या बजावली आहे यामध्ये तत्कालीन संचालक मंडळाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, याची चाचपणी करून काही आजी-माजी संचालक भाजपच्या संपर्कात आल्याचे सांगितले जात आहे.