जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा |सक्तवसुली संचालनालया च्या (ईडी) चौकशी वर काही परिणाम होईल, असे आपण बोलणार नाही. परंतु खान्देशातील नेतृत्व संपवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी विरोधकांवर केला आहे. तसेच सक्तवसुली संचालनालयाने आपली संपत्ती जप्त केलेली नाही तर अटॅच केल्याचा दावा त्यांनी केला आहे
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर असलेल्या आरोपानुसार 2016 मध्ये महसूलमंत्री असताना खडसे व त्यांचे जावई गिरीश चौधरी यांनी पुण्यातील भोसरी येथील एक भूखंड विकत घेतला होता. याचा बाजार भाव 31 कोटी असताना गिरीश यांनी तो अवघ्या तीन कोटीचा विकत घेतला हा भूखंड एमआयडीसीच्या मालकीचा होता इतक्या कमी किंमतीत व्यवहार कसा झाला ? आणि तो विकत घेण्यासाठी गोळा केलेल्या तीन कोटी रुपयाचा नेमका पर्याय काय होता ? याबाबत ईडी तपास करीत आहे.