जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | चंद्रकांत दादांचा व्यापारी आहे की त्यांनी यानिमित्ताने मान्य केलं तिची चौकशी त्यांनी लावली ही गोष्ट खरी आहे. त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेल हे मी बोललेलो आहे, आणि योग्य वेळी त्या संदर्भामध्ये सीडी येईल, सीडी ची चौकशी पोलिसांकडून चार-पाच महिन्यापासून सुरू आहे याबाबत सविस्तर अहवाल आल्यानंतर तुम्ही सादर करेल असे खडसे यांनी माध्यमांशी बोलताना त्यांच्या विरोधकांना पुन्हा चेकमेट दिला आहे.
गेल्या 40 वर्षांपासून राजकीय जीवनात काम करीत आहे चाळीस वर्षांमध्ये एकही आक्षेप माझ्यावर घेण्यात आला नाही, आक्षेप हेतू पुरस्कर घेण्यात आला आहे. या व्यवहाराची पूर्ण चौकशी झाली आहे चौकशी ची “सी समरी” कोर्टात गेली आहे, त्या मध्ये कुठलेही तथ्य नाही असे एसीबीने दिलेले आहे, तरीही चौकशी सुरू आहे. आणि ” कर नाही तर डर कशाला” या माध्यमातून मी ही चौकशीला सामोरे जात आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी सरकारला वारंवार विचारत होतो की माझा काय दोष आहे ? तो तरी सांगा माझी भाषणे युट्युबवर आजही आहे मी नेहमी सांगितलं की काय दोष आहे ” असेल तर मला फाशी वर लावा ” असे मी सभागृहात सांगितले आता आणखी ईडीची चौकशी लावली जे असेल ती कार्यवाही होईल. असे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.