मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यासाठी नेमके कोणी सांगितलं होतं, याची सर्वत्र चर्चा सुरू असताना शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली होती. यामध्ये ते अटके संदर्भात बोलताना दिसून येत आहे यावरून भाजपाने परत त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असताना आता ईडी कडून अनिल परब यांना नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय त्यांना 31 ऑगस्ट रोजी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास देखील सांगण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रा दरम्यान महाड येथे माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्या नंतर राज्यात बराच गोंधळ उडाला होता भाजप शिवसेनेमध्ये संघर्ष पेटला होता. या प्रकरणी नारायण राणे यांच्यावर अटकेची कारवाई देखील झाली, मात्र त्याच दिवशी रात्री उशिरा महाड कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला होता नारायण राणे यांना अटक करावी अशा आशयाची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.