जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सीजन साठा संपल्या च्या बातम्या काही वेळेपूर्वीच प्रसार माध्यमातून वायरल करण्यात आल्या होत्या मात्र सतरा ते अठरा तास पुरेल इतका ऑक्सिजन साठा जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.काही तासात ऑक्सिजम टॅंक जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जिल्हा रुग्णालयात नाशिक येथून ऑक्सिजन साठ्याचा पुरवठा सध्या केला जात आहे नेहमी येणाऱ्या ऑक्सीजन टॅंक चा च्या चालकाचा संपर्क जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या सेंटर सोबत तुटल्याने प्रचंड खळबळ माजली होती यामुळे वैद्यकीय महाविद्यालयातील यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली आहे मात्र काही तासात ऑक्सिजन टॅंक जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय दाखल होणार असल्याची मिळत आहे.