जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या प्रयत्नातून धरणगाव तालुक्यातील चांदसर येथील व्यायाम शाळा मंजूर होऊन साहित्य मिळाले. चांदसर येथील लोकनियुक्त सरपंच सचिन भाऊ पवार यांनी पालकमंत्री यांच्याकडे व्यायाम शाळेची मागणी केली असता ना पाटील यांनी तत्काळ मंजूर करून घेतली. तरुणांचे शरीर सुदृढ व्हावे यासाठी मंत्रीमहोदय सतत प्रोत्साहन देत असतात. ना. गुलाबरावजी पाटील यांच्यातील युवा जागा होऊन त्यांनी सुद्धा व्यायाम करण्याच्या आनंद घेतला.
याप्रसंगी व्यायाम शाळेचे उद्घाटन व साहित्य पूजन करतांना पालकमंत्री मंत्री गुलाबरावजी पाटील. विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर,. सचिन भाऊ पवार ग्रामस्थ व युवासैनिक उपस्थित होते.