चाळीसगाव राजमुद्रा वृत्तसेवा | तालुक्यात अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण तालुका हा पूर स्थितीच्या संकटात अडकला आहे मंगळवारी रात्री अचानक पितर नदीला पूर आल्याने संपूर्ण पाणी हे परिसरात पसरले यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली तितुर नदीचे पाणी गावात घुसल्याने संपूर्ण ग्रामीण भागासह शहरी भागात कोट्यवधीचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे शहरातून वाहणारी तितुर नदी चे जर वेळीच खोलीकरण नगरपालिकेने केले असते तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती अशी नाराजी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाळीसगावातील ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले आहे वेळोवेळी निवेदन देऊन देखील तसेच या संदर्भात बातम्या तितुर नदीचे खोलीकरण झालेले नाही यामुळे शहरात पूरस्थितीचा धोका निर्माण झाला आहे. अनेकांचे संसार उघड्यावर आल्याने नागरिक बेहाल झाले आहे.
चाळीसगाव शहरातील मध्यरात्री तितुर नदीने अचानक धोक्याची पातळी ओलांडली शहरातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन पळ काढावा लागला यावेळी अनेक संसार उघड्यावर आले आहे. शहरातील संपूर्ण जनजीवन यामुळे विस्कळीत झालेले आहे. शासनाच्या वतीने जरी मदतकार्य सुरू असले तरी पुरेशी मदत अद्यापपर्यंत पूरग्रस्तांना मिळाली नाही रिंग रोड परिसरातील पीर मुसा कादरी दर्गा देखील पाण्यात बुडाली आहे दर्गा परिसरात राहणाऱ्या नागरिकांना पाण्याची पातळी वाढल्याने दर्ग्यातील आपलं वास्तव सोडावे लागले आहे. शासनाने पूरग्रस्तांसाठी त्वरित मदत जाहीर करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.