जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | मधील अविनाश पाटील, वेदांत नेमाडे, व हितेश नेमाडे हे तीन युवक मोटर्स सायकलीवरून लेह लडाख च्या प्रवासासाठी आज निघाले. त्यांना जळगावच्या हॉबी क्लब तर्फे निरोप देण्यात आला. सुरुवातीला प्राध्यापक प्रकाश महाजन यांनी साहस वीरांना हो बी क्लबच्या सदस्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर ट्रेकिंग साठी निघालेले साहस वीर अविनाश पाटील , हितेश नेमाडेव वेदांत नेमाडे यांनी प्रवासाच्या मार्गाबद्दल माहिती दिली.. त्यांचा हा प्रवास विविध राज्यातील जनतेचे मने जुळणे व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणे या संकल्पनेतून होत आहे. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. डॉ. युवराज वाणी यांनी केले होते.
या साहस वीरांचे औक्षण प्रा. सौ. ललिता वाणी यांनी करून त्यांना शुभेच्छा दिल्या. साहस वीरांचा सत्कार हॉबी क्लब से अध्यक्ष मजीद भाई झकेरिया, प्रकाश महाजन व प्रा. डॉ. युवराज वाणी यांनी शाल श्रीफळ देऊन केला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जळगावच्या आय. टी. आय. चे प्राचार्य जुबेर मलिक उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात मजीद भाई
झकेरिया यांनी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या प्रयत्नाचे कौतुक केले. प्रवासात येणाऱ्या अडचणींची माहिती देऊन सहकार्याचे आश्वासन दिले.प्रा. महाजन यांनी हॉबी क्लब चे माहिती दिली. साहस वीरांना मजीद भाई झकेरिया यांनी P श्रद्धा कॉलनी मधील प्रबोधन हेल्थ क्लब जवळूनहिरवा झेंडा दाखवून प्रवासाला सुरुवात केली. कार्यक्रमास हॉबी क्लब से सदस्य, श्री. गुणवंत पाटील , सुषमा पाटील, वंदन वाणीव नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रकाश महाजन यांनी केले.