जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या राज्यपाल नियुक्त आमदार की वरून राज्यात मोठा गदारोळ सुरू आहे, महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकूण 12 नावे राज्यपाल नियुक्ती आमदारकी करिता देण्यात आलेले आहेत मात्र अद्याप पर्यंत राज्यपाल भगतसिंह यांनी निर्णय घेतलेला नाही यासंदर्भात कोषारी यांनी मा विकास आघाडीच्या नेत्यांना आमंत्रण देत यासंदर्भातली भूमिका मांडण्याचे सांगितले होते. काही नावांवर राज्यपाल विचाराधीन आहे असे देखील सांगण्यात आला आहे मात्र भाजप मधून दाखल झालेले राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्या आमदार की बाबत मोठा संभ्रम झाला आहे. राष्ट्रवादीत जाऊन पहिलाच वाढदिवस खडसे साजरा करीत आहे. या वाढदिवसा निमित्ताने त्यांना महा विकास आघाडीचे राज्यपाल नियुक्ति आमदारकीचे पहिले बर्थडे गिफ्ट मिळणार काय ? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.
भाजपा सोडून राष्ट्रवादीत गेल्यानंतर माजी मंत्री एकनाथराव खडसे हे प्रथमच आपला वाढदिवस साजरा करीत आहे जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात त्यांच्या हितचिंतकांचे पोस्टर बॅनर लावण्यात आले आहे तसेच विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे खडसे सभागृहात जाणार अशी त्यांच्या कार्यकर्त्यांना आशा आहे मात्र राज्यपालांच्या मर्जीतली आमदारकी असल्याने भाजप त्याच्यात आडकाठी ठरतंय का ? असा सुद्धा सवाल उपस्थित केला जात आहे. खडसे आमदार होणार आणि लवकरच त्यांना राष्ट्रवादी मंत्रिपदी बसणार अशी अपेक्षा खडसे समर्थकांना आहे.
यासंबंधी काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी खडसे हे लवकरच मंत्री मंडळात जातील असे सूतोवाच केले होते, ते आज जरी खरे ठरले नसले तरी राज्यपालांच्या आश्वासनानंतर लवकरच त्यांची आमदार पदी वर्णी लागणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह चैतन्य पसरलेला आहे, हा वाढदिवस कार्यकर्त्यांना खडसे मंत्री म्हणून साजरा करतील अशी अपेक्षा होती मात्र राज्यपालांच्या भूमिकेमुळे आणि केंद्रातील भाजपाच्या आडकाठी धोरणामुळे तूर्त राज्यपाल नियुक्ती आमदारकी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.