यावलमध्ये सीएमव्हीची आढळली प्राथमिक अवस्थेतील लक्षणे
इर्व्हिनिया रॉटचाही प्रादुर्भाव : कृषी तज्ञ महाजन
रावेर राजमुद्रा वृत्तसेवा | यावल तालुक्यातील लागवड केलेल्या केळी बागांवर सीएमव्ही रोगाच्या (कुकुंबर मोझॅक व्हायरस) प्रादुर्भावाची सुरुवात होत असल्याचे कृषी तज्ज्ञाच्या पाहणीत आढळून आले आहे. रावेर तालुक्यातील रसलपूर, चिनावल, ऐनपूर, रोझोदा, कळमोदा या ठिकाणी तर यावल तालुक्यातील न्हावी, बोरखेडा या गावांच्या शेती शिवारात या रोगाची प्राथमिक अवस्थेतील लक्षणे आढळून आली आहेत. तर कोचुर, पुनखेडा, रसलपूर, मुंजलवाडी, कुसूंबा या ठिकाणी केळीवरील इर्व्हिनिया रॉट या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्याची माहिती पाल कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ञानी दिली आहे.
रावेर व यावल तालुक्यात सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली जाते. मात्र दरवषी केळी उत्पादक शेतकऱ्यांना कधी गारपीट, वादळ तर कधी विविध रोगांच्या समस्येला तोंड द्यावे लागते. याचा परिणाम केळीचे उत्पादन घटण्यावर होतो. गेल्यावर्षी तालुक्यातील केली बागांवर मोठ्या प्रमाणावर सीएमव्ही रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना केळी बागा उपटून फेकण्याची वेळ आली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले होते. सध्या रावेर व यावल तालुक्यातील काही गावांमधील बागांवर सीएमव्ही (कुकुंबर मोझॅक व्हायरस )सीएमव्ही रोगाची लक्षणे
सीएमव्ही रोगाची लक्षणे
हरितद्रव्य (इन्फेक्शियस क्लोरोसिस)लोप पावणे हे सीएमव्ही रोगाचे प्रमुख लक्षण आहे. केळीच्या झाडाच्या पानांच्या शिरातील हरितद्रव्य नष्ट झाल्याने शिरातील उतींचा ऱ्हास होऊन त्या मृत पावतात. त्यामुळे पानांवर पिवळसर सोनेरी रेषा किंवा अनियमित चट्टे दिसून येतात. पोंगा व पोंग्याजवळचे पान कुजते. झाडाची वाढ खुंटून कालांतराने झाड मरते