खासदार उन्मेश दादा पाटील यांनी घेतली पंचनामा बाबत आढावा बैठक..
नुकसानग्रस्त व्यापारी, लोटगाडी धारक, भाजीपाला व्यापारी, इतर व्यावसायिकांनी मांडली कैफियत
चाळीसगाव – शहरात अतिवृष्टीचा फटका सहन करावे लागलेले नुकसानग्रस्त व्यापारी, लोटगाडी धारक, भाजीपाला व्यापारी, इतर व्यावसायिकांनी मांडलेली कैफियत आणि प्रशासनाने पंचनामे बाबत घेतलेली भुमिका यात समन्वय ठेवावा. अतिवृष्टीने दुर्दैवी प्रसंग ओढवला असुन वराह, घोडे, गायी, शेळी, मेंढीसह अनेक पाळीव प्राणी, घरांची पडझड, वाहून गेलेले भांडी कुंडी संसारपयोगी सामान या सर्वांचा पंचनामा वस्तुनिष्ठ करावा. व्यापाऱ्यांचा , लहान मोठे व्यावसायीकांचे गोडाऊन, दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे.राज्य सरकारकडे कोकणच्या धर्तीवर मदत मागितली आहे. भविष्यात पंचनामा नसल्याने एखादा नुकसान भरपाई पासुन वंचित राहू नये. यासाठी प्रशासनाने काळजीपूर्वकपणे पंचनामे करून घ्यावेत.
आज हे सर्व घटक उध्वस्त झालेले असून एकही नुकसानग्रस्त वंचित राहू नये याची खबरदारी घ्यावी अशी सूचना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केले आहे.
आज तहसीलदार कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खासदार उन्मेश दादा पाटील बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, प्रभारी मुख्याधिकारी रवींद्र लांडे , गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे,भाजप शहराध्यक्ष नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील, नगरसेविका विजया भिकन पवार,माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, नगरसेवक गणेश महाले, सर्वेश पिंगळे आदी मान्यवर व्यापारी बांधव तसेच महसूल व नगरपालिका कर्मचारी अधिकारी उपस्थीत होते. तहसीलदार अमोल मोरे यांनी प्रास्तविक केले. मुख्याधिकारी रवींद्र लांडे साहेब यांनी आभार मानले.